Tuesday, January 20, 2015

लोकसभा poem....

लोकसभा
ही करते गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,
खुर्चीवाला करतो मग पाच वर्ष दिवाळी साजरा.
आली ही की होते सार्‍यानंचीच करमणूक,
आहे ही आपल्या देशाची लोकसभा निवडणूक.

हिच्यासाठी नेते करतात मतदारांची फसवणूक,
प्रचारासाठी रात्रंदिवस काढतात मिरवणूक.
हिच्यापायी नसते कुठे कोणाला ही मुभा,
गल्ली ते दिल्ली चालतात सारख्या जाहीर सभा.

हिला नाही लागत शिक्षण,संशोधन ना कुठला भाभा,
कारण आहे ही आपल्या खासदारांची लोकसभा.
जिंकण्यासाठी हिला सामील होतात सारे,
अन प्रचारात दाखवतात जनतेला विकासाची गाजरे.

आली ही की सर्वांचीचं होते परेशानी,
काळ असतो हिचा जणू काही आणीबाणी.
भल्याभल्यांच्या तोंडच पळवते पाणी,
पण शेवटी होते एकाचं राजाची राणी.

हिला जपणे झाले आता अवघड,मनमोहनचा खाली केला गड,
सोनिया आणि राहुल आघाडीसाठी करत आहेत धडपड.
आहेचं अशी ही जिची सर्वांनाच चाहूल,
सत्ता पुन्हा हाती यावी म्हणून परेशान बाबा राहुल.

प्रचाराची हवा करत गुजरातवाला म्हणतो आपलीचं गादी,
निवडणुकी अगोदरच जनता म्हणतेय पंतप्रधान नरेंद्र मोदी.
याव महायुतीचं सरकार म्हणून आठवले फिरवतात त्यांचे झेंडे,
त्यांच्या पाठी उभा उद्धव राजू अन गोपीनाथ मुंडे.

कोंग्रेस म्हणते राष्ट्रवादीला तुम्हाला २२ चं जागा,
८ खासदारावर साहेब उडया मारतात, आणि राष्ट्रवादी म्हणते!
साहेब पंतप्रधान पद मागा.

जिंकण्यासाठी हिला बाजारात आला एक नवीन माल,
नाव त्याचं दिल्लीकर मुख्यमंत्री अरविंद केजरीवल.
असाच बनला दिल्लीचा मुख्यमंत्री करून रसत्यावर जनता गोळा,
आता आहे त्याचा लोकसभेवरती डोळा.

आली ही की होते सार्‍यानंचीच करमणूक
आहे ही आपल्या देशाची लोकसभा निवडणूक...!!!



                                          - नागेश कुलकर्णी.



1 comment: