Friday, June 12, 2015

बदलत्या संस्कृतीचे साक्षीदार

बदलत्या संस्कृतीचे साक्षीदार
          आजकालची तरुण पिढी आणि बदलणारी संस्कृती यांची बदलती वागणूक पाहता, बदलणार्‍या भविष्यातील भारताचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे वाटते. पाश्चिमात्त्य विचारसरणीचा बडगा आणि साता समुद्रापल्याडच्या संस्कृतीचे आकर्षण यामुळे तरुण मुलं-मुली व्यसनाधीन आणि वासनांधतेकडे वाहवत जाताना दिसत आहेत. परिणामांचा विचार करता क्षणिक सुखांच्या मागे लागणार्‍या  तरुणांना भारतीय संस्कृतीची जाण करून देत, वेळीच आवरायला हवे, अन्यथा भारताच्या संस्कृतीचा नाश करून एकमेकांच्या ऊरावर बसून थयथया नाचायला देखील पुढील पिढ्या मागे-पुढे पाहणार नाहीत.
            काही दिवसांपूर्वी युरोपमधील संस्कृतीप्रमाणे आयर्लंडमध्ये जनतेकडून सार्वमत घेऊन समलिंगी विवाहांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गे मॅरेजला प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेथील लोकांनी आनंदोत्सव साजरा करत पार्ट्या केल्या. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या सर्व प्रकाराचे समर्थन करत आयर्लंडच्या जनतेचे अभिनंदन केले. यापुढील काही कालावधीनंतर अभिव्यक्तीच्या नावाखाली  आपल्या भारत देशात देखील अशा मतदानानंतर, असे विचित्र चाळे कायद्यात रुपांतरित होण्यास वेळ लागणार नाही, कारण नव्या पिढ्यांना जुन्या रितीरिवाजाप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे अंधश्रद्धाळू राहण्यास आवडत नाही म्हणे. त्यांना रात्रीच्या वेळी रेव्ह पार्ट्या करताना नंगा नाच करायला जास्त आवडू लागले आहे. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या भारत देशात असे काही झाले तर विचार करा? काय महाप्रलय येईल? माणसात माणुसकी राहणार नाही. प्राचीन काळी योगसाधनेत ध्यानमग्न असलेला भारतीय युवावर्ग सध्या  संभोग आणि व्यसन यामुळे एड्ससारख्या अतिभयंकर रोगांचा बळी ठरत चालला आहे. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये तर आंतरजातीय विवाहांना देखील विरोध आहे, मग गे मॅरेजला मान्यता कशी मिळू शकेल, असा फुकाचा डंका पिटवला जातो, परंतु येथे एक लक्षात घ्यावे की भारतामध्ये कायदे असोत वा नसतो लोकशाहीमुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनमर्जीनुसार वागते. चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही...!
            आजकाल स्त्री आपल्या घरात देखील सुरक्षित राहिलेली नाही. रोज वर्तमानपत्रांमधून नवनव्या हेडलाईन्स झळकत आहेत. बापाचा मुलीवर डोळा, भावाचा बहिणीवर डोळा, दीर-भावजयीचे अनैतिक संबंध टक कुठे आई-मुलगा, सांगावयास लाज वाटावी एवढ्या खालच्या थराला समाज जात आहे, आणि यालाच समाज आपल्या परीने बदलतो आहे आणि ही काळाची गरज आहे, असे काही समाजकंटक लोक बोलत राहतात. यामध्ये राजेंद्र पचौरी, तहलका फेम तरुण तेजपाल, आसाराम बापू यांसारखे लोक देखील अडकले जातात, समाज बदलतो आहे म्हणे. अहो अशा लोकांना भर चौकात उभं करून  पोकळ बांबूंचे फटके द्यायला हवेत. भारतीय संस्कृती काय आहे, याचा सर्व समाजमान्य उच्चवर्णीयांना विसर पडतो आहे, याला इंटरनेट आणि वृत्तपत्रांच्या स्रोतांचा हातभार लागतोच. प्राचीन संस्कृतीत, एव्हाना आजदेखील काहीजण वेळ काढून योगसाधना, ब्रह्मचर्याचे पालन, युवावर्गासाठी लैंगिक शिक्षण यांचे धडे देतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असल्याचे शिकवले जाते, परंतु आजकाल हा सारा थोतांडपणा वाटतो लोकांना, येथे य बी  सारख्या शोज् ना मान्यता मिळते. करण जोहर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा यांसारखे बॉलिवूड कलाकार या कार्यक्रमाचा आनंद घेतात. येथे दीपिका पदुकोणचा इट्स माय चॉईसहा व्हिडिओ प्रदर्शित होतो, स्त्रियांना देखील पुरुषांएवढाच अतिरेक करण्याचा अधिकार हा व्हिडिओ सांगून जातो. यावरून फक्त आनंद मिळवण्यासाठी, शरीर संबंध प्रस्थापित करणार्‍या  नवपिढीतील पुरुष हा प्रत्येक स्त्रीकडे फक्त स्त्री या नजरेने पाहतो, यामुळे आजच्या समाजमान्यतेनुसार अश्लिलतेची खरी व्याख्या काय हाच कधी कधी प्रश् पडतो?
            एकीकडे गांधी मला भेटला या कवितेत अश्लील शब्द वापरले म्हणून, त्या कवीवर ३० वर्षे खटला चालतो, तर दुसरीकडे जगभरात इंटरनेटवर सुरू असलेल्या चार कोटींपेक्षा अधिक अश्लील माहिती पुरवणार्या साईट्सना आपण बंद करू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देते. वाढत्या इंटरनेटच्या युगात अरुणा शानबाग खटला, दिल्ली गँगरेप, शक्ति मिल खटला अशा खटल्यांचा निर्णय देताना वरवर न्याय देणार्‍या  सर्वोच्च न्यायालयाने मुळावरच घाव घालायला हवा, इंटरनेटवरील या चार कोटी साईट्स बंद केल्या किंवा देशातील कुंटणखाने बंद केले तर काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार व्हायला हवा. भारतीय संस्कृतीची परिभाषा तरुण वर्गास शिकवावयास हवी. तरुणांनी पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या भपकेबाजीपासून दूर राहत, त्यापासून काय घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे याचा विचार करायला हवा. बदलत्या संस्कृतीचे साक्षीदार होत असताना, सर्वसामान्यपणे तरुण पिढीने समाजव्यवस्थेच्या चालीरितीत अडकता आणि अतिशयोक्तीपणे वासनांध वा व्यसनाधीन होता भविष्यातील भारत घडवायला हवा.
            भारतीय संस्कृती काय सांगते, एव्हाना कवी, लेखक स्त्री ला कोणत्या प्रकारे सन्मानित करतात याचा आदर्श घेत असताना तरुणांनी आणि तरुणींनी देखील भविष्यातील संस्कृतीस जपत, प्राचीन भारतीय संस्कृतीचा  साठा जपायला हवा. कवी कुसुमाग्रज त्यांच्या फटका या काव्यप्रकारात म्हणतात,समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका, दासी म्हणूणी पीटू नका वा देवी म्हणूणी भजू नका.” प्राचीन भारतीय संस्कृती स्त्रियांचा आदर करावयास शिकवते, त्यामुळे स्त्रियांनी देखील काही बाबतीत आपल्या मर्यादा ओलांडता या पुरुषप्रधान संस्कृतीत वावरायला हवे. याचा अर्थ त्यांनी चूल आणि मूल या पलीकडे जाऊ नये असा होत नाही, त्यांनाही स्वातंत्र्य आहे, परंतु या स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्यासाठी उपयोग होऊ नये. वाढत्या व्यापात जबाबदारीने वागणे आणि स्त्रीला स्वातंत्र्य असणे यात फरक आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ () नुसार घरेलु हिंसा कायदा सासरी असणार्‍या स्त्रियांचे हिंसाचारापासून रक्षण करतो. परंतु सासरच्या लोकांना छळण्यासाठी ४९८ () चा शस्त्र म्हणून वापर होताना दिसून येतो, शिकलेल्या आणि कायदा माहीत असलेल्या मुली सासरच्या व्यक्तींना या कायद्याचे सतत भय दाखवत आहेत. यामुळे समाजात कायद्यांवरील विश्वासदर्शकता नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. तसेच कलम ३७७ बद्दल बोलायचे झालेच तर तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी कायदे करून बदलण्यात आलेल्या या कलमाला समाजाने स्वतःसाठी असल्यागत उपयोग करवून घेतला आहे. गतिमंद, मतिमंद मुलांवर अनैसर्गिक कृत्यांचे प्रकार वाढत आहेत. शिक्षक-मुले, शिक्षिका-मुले, शिक्षक-मुली यांचे नाते देखील यामध्ये अडकते आहे. आईसमान असलेल्या मित्राच्या आईने एका बारा वर्षाच्या मुलावर जबरदस्ती केली, तर कुठे सहा महिन्यांच्या बाळावर बलात्काराच्या घटना घडत आहेत. थांबवा रे हे सारे! या पलिकडे देखील माणुसकी नावाचे जग आहे. वयात येणार्या प्रत्येक युवक-युवतीस त्यांच्या पालकांनी लैंगिक शिक्षण जबाबदारीने दिले तर हे पुढील अतिप्रसंग टळू शकतात. परंतु पालक आणि पाल्य यांमधील हा हरवलेला संवाद भावी पिढ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो. गांधी मला भेटला या कवितेत हस्तमैथुन या शब्दाचा उल्लेख केला म्हणून त्या कवितेवर खटला भरवला जातो, येथे दररोज कोट्यवधी तरुण हस्तमैथुन करून स्वतःचे चारित्र्य क्षीण करत असतील,त्याचे काय? युवा अवस्थेतील तरुण पिढीने हे स्वतःहून बदलायला हवे. (माफी असावी अधिक प्रखर लिहितो आहे.)
            शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये खूप फरक असतो आणि  भारतीय संस्कृतीनुसार आयुष्य खूप सुंदर आहे, आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेने समाजात वावरा, स्त्रियांचा सन्मान करा, स्वतःसाठी जगताना कृपया व्यवनाधीनता आणि वासनांधता यांपासून दूर रहा. तरच खरा भविष्यातील युवा भारत घडले

No comments:

Post a Comment