| शिवजन्म स्थळ |
Wednesday, March 29, 2017
दुर्ग भ्रमंती - शिवालय शिवनेरी
Thursday, March 16, 2017
प्रश्नार्थक ‘उत्तर’ प्रदेश
Tuesday, March 14, 2017
दुर्ग भ्रमंती - दुर्गराज रायगड
गड
कसा पहावा याच देखील एक तंत्र
असत,
प्रत्येकाने
गडाची वाट चालत असताना हे
तंत्र पाळत आणि गडाचे सौंदर्य
अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला
हवी.
दुर्ग
भ्रमंती करत असताना ज्या
व्यक्तीचे वाचन आहे,
तो
व्यक्ती कल्पनाशक्तीच्या
आधारे गडांचे सौंदर्य आणि
इतिहास अनुभवू शकतो.
मात्र
त्यासाठी दुर्ग भ्रमंती आवश्यक
आहे.
रायगड(पाचाड).
जि.रायगड.
महाराष्ट्र.
स्वराज्याच्या
राजधानीचे ठिकाण असलेल्या
दुर्गराज रायगडास इतिहासात
आजवर विविध
नावांनीसंबोधिले गेले आहे.
रायगड,
रायरी,
इस्लामगड,
नंदादीप,
जम्बूद्वीप,
राजगिरी,
भिवगड
या नावांनी इतिहासत रायगडास
ओळखले जात असे.
मुंबईहून
रायगडला जाण्यासाठी मुंबई-गोवा
राष्ट्रीय महामार्गावरून
महाडपर्यंत येऊन पुढे पाचाड
(रायगड
पायथा)
पर्यंत
जाता येते.
पुण्याहूनभोरमार्गे
वरंधा घाटातून महाडला परिवहन
महामंडळाच्या बसेस असतात.
पुढे
पाचाड गावापर्यंत महाडहून
बस तसेच टमटम,
गडाच्या
पायथ्यापर्यंत जातात.
पुढे
गडावर जाण्यासाठी रोप वे ची
देखील सुविधा आहे.
तसेच
गडावर पायऱ्या चढून देखील
जाता येते.
परंतु
गडाच्या पायऱ्या चढून जाण्यात
जी मजा आहे ती रोप वे ने जाण्यात
नाही.
शाळा
महाविद्यालयांच्या आणि अनेक
पर्यटन कंपन्यांच्या सहली
रायगडावर येत असतात.
तसेच
अनेक शिवप्रेमी गडावर नियमितपणे
येत असतात.
मुख्यत्वे
पावसाळ्यामध्ये रायगडावर
अधिक पर्यटक असतात.
रायगडावर
केवळ पर्यटक म्हणून जायचे
असेल तर सह्याद्रीच्या कुशीत
वसलेला हा अप्रतिम गड पाहण्यासाठी
नक्की जा.
स्वराज्याच्या
राजधानीस भेट देण्यासाठी
रायगड वारी करायची असेल तर,
महाराष्ट्राचे
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी
राजांच्या पद स्पर्शाने पावन
झालेल्या रायगडावर जात असताना
तिथे आपल्याकडून काही वेगळी
हरकत होणार नाही याची नक्की
काळजी घ्या.
गडाचे
पावित्र्य आणि सौंदर्य टिकवून
ठेवण्यासाठी गडावर स्वच्छता
राखण्याचे काम आपणच करणे
गरजेचे आहे.
रायगडावर
इतिहासाची आठवण करून देणाऱ्या
आणि स्वतःचे पावित्र्य टिकवून
असलेल्या ठिकाणी फिरत असताना
जो अनुभव येतो,
तो
अद्भुत आहे.
त्याबाबत
माहिती...
पाचाडचा
आईसाहेब जिजाबाईंचा वाडा आणि
समाधी :
रायगड
किल्ल्याच्या
पायथ्याशी
पाचाड
येथे
राजमाता
जिजाऊंची
समाधी
आहे.
तसेच
उतारवयात
जिजाबाईंना गडावरची थंड हवा,
वारा
सहन होत नसे,
त्यामुळे
महाराजांनी त्यांच्यासाठी
पाचाडजवळ एक वाडा बांधून दिला
होता. पाचाड
गावात या वाड्याचे अवशेष
सुस्थितीत आहे.
येथे
असलेली तक्क्याची विहीर तसेच
जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले
दगडी आसन बघण्यासाठी पर्यटक
विशेष गर्दी करतात.
वाड्याच्या
परिसरात फिरत असताना जिजाऊ
मासाहेब आणि त्यांच्या
आयुष्यातील शेवटच्या क्षणांच्या
सर्व कल्पनांचा येथे भास होतो.
तुम्ही
जर रायगडावर मुक्कामी जाणार
असाल तर याठिकाणी संध्याकाळी
नक्की भेट द्या.
महादरवाजा:
दुर्गराज
रायगड चढत असताना सुरुवातीस
वाटेवर असणाऱ्या महादरवाज्याच्या
बाहेरील दोन्ही बाजूस दोन
सुंदर कमळाच्या प्रतिकृती
कोरलेल्या आहेत.
तसेच
महादरवाज्याच्या दोन्ही
बाजूस भव्य बुरूज आहेत.
महादरवाज्यातून
आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी
आणि संरक्षकांसाठी केलेल्या
राहण्याच्या खोल्या दिसतात.
महादरवाज्यापासून
उजवीकडे टकमक टोकापर्यंत आणि
डावीकडे हिरकणी बुरूजापर्यंत
भक्कम तटबंदी बांधलेली आहे.
हत्ती
तलाव आणि गंगासागर तलाव:
महादरवाज्यातून
थोडे पुढे गडाकडे जात असताना
हत्ती तलाव समोरच दिसतो.
गजशाळेतून
येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या
पाण्याची सोय व्हावी याकरिता
हा तलाव बांधण्यात आलेला होता.
हत्तीतलावापासून
जवळच गंगासागर तलाव आहे.
महाराज्यांच्या
राज्याभिषेकानंतर सप्तसागर
आणि नद्यांची आणलेली तीर्थे
याच तलावात टाकलेली होती.
त्यामुळेच
या तलावाचे गंगासागर असे नाव
अस्तित्वात आले आहे.
गडावर
आजही या पाण्याचा उपयोग केला
जातो.
सायंकाळी
या परिसरात पक्षांचा मधुर
आवाज ऐकायला येतो,
येथे
जवळच निवासाची सुविधा असल्यामुळे
तलावातील पाणी आणि गडाचे
सौंदर्य जवळून पाहता येते.
हिरकणी
टोक (हिरकणी
बुरुज)
:
गंगासागराच्या
पश्चिमेस चिंचोळी वाट हिरकणी
टोकाकडे जाते.
हिरकणी
गवळणीची एक कथा हिरकणी टोकाशी
संबंधित असल्यामुळे या बुरुजास
हिरकणी बुरुज असेही म्हणतात.
या
बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या
दिसतात.
बुरुजावरून
पाचाड,
खुबलढा
बुरूज, मशीद
मोर्चा ही ठिकाणे स्पष्टपणे
दिसतात.
पालखी
दरवाजा आणि मेणा दरवाजा:
मेणा
दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर
प्रवेश करता येतो.
तर
पालखी दरवाज्याने प्रवेश
केला की,
चढउतार
असलेला एक सरळ मार्ग आपल्याला
मेणा दरवाजापर्यंत घेऊन
जातो.त्याच्या
जवळच राण्यांचे महाल दिसून
येतात. सारे
अवशेष रूप आज याठिकाणी अस्तित्वात
आहे.
राजसभा
आणि राजभवन:
महाराजांचा
राज्याभिषेक राजसभा येथे
झाला होता.
येथे
पूर्वेकडे तोंड करून असलेल
महाराजांचे सिंहासन आहे.
येथून
मागील बाजूने बालेकिल्ल्याच्या
अंतर्भागात प्रवेश केला की
एक राजभवनमध्ये प्रवेश करता
येतो. जवळच
खलबतखाना देखील आहे.
राजसभा
परिसरात गेल्यानंतर समोरच
आसनस्थ छत्रपती शिवाजी
महाराजांची मुर्ती दिसून
येते. येथे
आजही सभा भरत असावी असा भास
होतो.
महाराजांची
नेत्र दिपक मुर्ती सर्वांचे
मन मोहून घेते.
बाजारपेठ:
राजभवनाकडून
महाराजांच्या समाधी स्थळाकडे
जात असताना समोर होळीचा मळा
लागतो. तेथे
छत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला
आहे. पुढे
जात असताना पुतळ्यासमोर जे
दोन रांगांमध्ये भव्य अवशेष
दिसतात,तेथे
पूर्वी बाजारपेठ होती.
भव्य
बाजारपेठेचे अवशेष आजही
पर्यटकांना आकर्षित करतात.
बाजारपेठेतून
जात असताना इतिहासात तेथील
वैभव काय असेल याची जाणीव
होते. अगदी
याची देही याची डोळा प्रसंग
समोर उभा राहावा,
अशा
ठिकाणी मोकळ्या जागेत बाजारपेठ
वसलेली आहे.
टकमक
टोक:
बाजारपेठेच्या
समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे
जाता येते.
टकमक
टोकाचा इतिहासात आहे.
टकमक
टोक हे गडावरील सर्वात उंच
ठिकाण असून,
गुन्हेगारांना
शिक्षा देण्यासाठी टकमक
टोकावरून त्यांचा कडेलोट
केला जात असे.
टकमक
टोक म्हणजे,
गडावरील
सर्वात उंच ठिकाण.
टकमक
टोकाकडे जात असताना जागा
निमुळती होत जाते,
अन
आपल्या ह्रदयाचा ठोका वाढत
जातो.
इतिहासात
या ठिकाणी कित्येक जणांचा
कडेलोट झाला असावा आणि त्यांचे
पुढे काय झाले असावे.
याचा
विचार आपण टोकाच्या शेवटी
जावून नक्की करायला लागतो.
शिरकाईदेवी
ही गडावरील मुख्य देवता आहे.
शिर्के
पाचव्या शतकापासून रायगडाचे
स्वामी होते.
याची
आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई
हिचे मंदिर गडावर आहे.
महाराजांच्या
समाधी स्थळाकडे पुढे जात
असताना समोर दिसणारे भव्य
मंदिर जगदीश्वराचे आहे.
जगदीश्वराच्या
मंदिरासमोर नंदीची मोठी
भग्रावस्थेतील मूर्ती आहे.
मंदिराच्या
गाभाऱ्यात गेल्यास समोर
हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.
मंदिराच्या
प्रवेशद्वारावर महाराजांच्या
समाधी स्थळाकडे जात असताना,
पायऱ्यांच्या
खाली एक शिलालेख दिसतो.
‘सेवेचे
ठायी तत्पर हिरोजी इंदलकर’.
रायगडाची
बांधणी करत असताना हिरोजी
इंदुलकर यांनी हा शिलालेख
येथे लावलेला आहे.
महाराजांची
समाधी:
जगदीश्वर
मंदिराच्या पूर्वदरवाजापासून
बाहेर पडताच समोर छत्रपती
शिवाजी महाराजांची समाधी
दिसते.
महाराजांच्या
समाधी स्थळावर महाराजांची
महती सांगणारी प्रतिकृती
उभारण्यात आलेली आहे.
या
परिसरातील शांतता आणि स्वच्छता
पाहता पर्यटक आणि शिवप्रेमी
महाराजांच्या समाधीस्थळी
दर्शनासाठी सतत गर्दी करत
असतात.
महाराजांच्या
ध्यानस्थ समाधी स्थळाजवळ
जायची योग्य वेळ म्हणजे,
सुर्योदय.
सकाळी
सकाळी महाराजांच्या समाधीवर
पडणारी सोनेरी सुर्यकिरणे
महाराजांसमोर नतमस्तक होण्यास
आतुर असतात असा भास या ठिकाणी
होतो.
महाराजांवर
अंत्यसंस्कार सुरु असताना
त्यांच्या चीतेमध्ये वाघ्या
नावाच्या कुत्र्याने उडी
घेतली होती,
असे
इतिहासात म्हटले जाते,
या
वाघ्या कुत्र्याची समाधी
महाराजांच्यासमाधीच्या
परिसरातच आहे.
भवानी
टोक :
महाराजांच्या
समाधी स्थळाकडून पूर्वेकडे
चालत गेल्यास शेवटी भवानी
टोक अशी पाटी लावलेली दिसते.
तुळजापूरच्या
दिशेने असलेले भवानी टोक हे
गडाच्या पुर्व दिशेचे शेवटचे
टोक आहे.
येथे
भवानी देवीचे एक मंदिर आहे.
समोर
सह्याद्री पर्वत रांगेतील
सौंदर्याने नटलेला परिसर
पाहण्यासाठी पर्यटक येथे खास
करून पावसाळ्यामध्ये येत
असतात.
भवानी
टोकाकडून महाराजांच्या समाधी
स्थळाकडे येत असताना महाराजांचे
समाधी स्थळ आकर्षक आणि महादेवाच्या
पिंडीप्रमाणे स्थिर आणि
चीरशांत,
ध्यानमग्न
असल्यासारखे दिसते.
सह्याद्रीच्या
रक्षणार्थ कटीबद्ध असलेला
हा दुर्ग इतिहासाची साक्ष
आहे.
आपल्या
पुर्वजांनी आपल्यासाठी
इतिहासाची साक्ष म्हणून
जोपासलेला सांस्कृतिक वारसा
दुर्गराज रायगड टिकवून आहे.
रायगडाने
अनेक आक्रमणे पाहिली आहेत.
अनेक
लढाया लढल्या आहेत.
परंतु
तो अजून ही उभा आहे.
स्वराज्याचे
आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी
महाराज आणि संभाजी राजांच्या
शौर्याची साक्ष देणाऱ्या या
दुर्गराजास आपण वेळ काढून
नक्की भेट दयायला हवी.
आणि
हा वारसा पुढील पिढ्यांसाठी
अभिमानास्पद ठरावा याकरिता
आपण प्रयत्न करायला हवेत.
मुंबई
तरुण भारतसाठी दुर्ग भ्रमंती ही लेख माला सुरु केली आहे. त्या लेख मालेतील हा पहिला लेख.
नागेश कुलकर्णी.
Friday, March 3, 2017
अभिव्यक्तीच्या नावाने चांगभलं !
Wednesday, November 23, 2016
शहाण्यांचा मुर्खपणा
'शहाण्यांचा मुर्खपणा' या शिर्षकाखाली विधवांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गो.ग. आगरकर यांनी लेख लिहिल्याची इतिहासात नोंद आहे. परंतु आजच्या घडीला सुशिक्षित राजकारणी तसेच तथाकथित कायमस्वरूपी सरकार विरोधक ज्याप्रकारे आणि ज्या स्थितीत सरकार द्वेष्ठेपणा दाखवतं आहेत अथवा राजकारण करत आहेत, ते पाहता हा शहाण्यांचा मुर्खपणा आहे, असेच म्हणावेसे वाटते.
दिल्ली विधानसभेत बहुमतावर स्वार असलेले नामधारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे माजी केंद्रीय कर्मचारी आहेत तसेच आदरणीय आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील एकेकाळचे त्यांचे सहकारी आहेत. बहुधा केजरीवालांचा हा भूतकाळच आजवर त्यांच्या पाठीशी असल्यामुळे जनतेने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यास दिल्लीत परवानगी दिली होती. परंतु राजकारणाचा गंध ही नसलेले केजरीवाल, राजकारणात आल्या पासून सरळ सरळ कोणावरही काहीही आरोप करतं सुटले आहेत. लोक त्यांचा हा बालिषपणा हसण्यावरी घेतं असले तरी, दिल्लीतील जनतेने दिलेल्या बहुमताचा हा अनादर आहे,हे आपणास विसरुन चालणार नाही. मान्य आहे, केंद्रीय सरकारी पक्षाच्या विरोधकाच्या भूमिकेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी केजरीवालांची ही धडपड सुरू असावी! परंतु शहाणे असताना देखील ते असे मुर्खासारखे वागत आहेत.
केजरीवालांनी केलेल्या आरोपांपैकी एक आरोप असा आहे की,सरकारने म्हणे नोट बंदीचा निर्णय घेऊन आठ लाख कोटींचा घोटाळा केला, तसेच बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली. पण जनता संभ्रमात आहे, की हे शहाणे आहेत, माजी केंद्रीय कर्मचारी आहेत, तरीही हे दिशाभ्रम करतायत की स्वतःच संभ्रमात आहेत? जनतेचा पैसा बँकेत जमा आहे. त्याचवेळी बँकांनी उद्योगपतींची कर्ज नावे 'Non Performing Assets' यादीमध्ये जमा केली, याचा संबंध लावला तरी ठीक, परंतु हा घोटाळा कसा म्हटला जावू शकतो? आणि तसेही कोणाचेही कर्ज माफ केले नसून त्यांना नॉन परफॉर्मिंग असेट्स यादी मध्ये टाकल्याचे खुद्द SBI अध्यक्षांनी सांगितले आहे. तरीही हे केजरीवाल नावाचे व्यक्ती केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी या गोष्टीस पुन्हा पुन्हा मांडत आहेत. आणि असे इतरही काही बिनबुडाचे आरोप ते पंतप्रधान मोदींवरती करत सुटले आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आपणही आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपड कारणाऱ्यांच्या यादीत आपलाही समावेश व्हावा यासाठी, चिट फंड घोटाळ्याचे आरोप असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममताजी देखील धावाधाव करत आहेत. खरे तर या राजकीय विरोधकांना जनतेचे काहीही देणेघेणे नाही, यांना केवळ सरकारच्या नोट बंदीच्या निर्णयाचे राजकारण करायचे आहे, आणि त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे. त्यामुळे यास शहाण्यांचा राजकीय मुर्खपणा म्हणावे नाहीतर दुसरे काय म्हणावे?
उत्तरप्रदेशात पुढीलवर्षी विधानसभेच्या निवडणुका होताहेत. त्यामुळे खरंतर 'सप', 'काँग्रेस' आणि 'बसप' या निर्णया विरोधात उड्या मारत आहेत. कारण विरोध करणे हा विरोधकांचा हक्क असल्यागत आपल्या देशात राजकीय पुढारी विरोध करत असतात. तसेच इतरही काही शहाण्या परंतु सरकारच्या नोट बंदी निर्णयानंतर मुर्खासारखे वागणाऱ्या राजकारण्यांबाबत बोलावे लागेल, कारण त्यांचे ही हात दगडाखाली अडकलेले आहेत.
सरकाने 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्रास जरी होत असला, तरी या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे, कारण काहीतरी वेगळं होत असल्याबद्दल लोक समाधानी आहेत. सरकारमध्ये सत्तेत कोणता पक्ष आहे हे न पाहता त्यांनी घेतलेला निर्णय किती प्रभावी ठरू शकतो, या दृष्टीने ही विचार करणे आवश्यक आहे. आणि निर्णयाचे फळ येणारा भविष्यकाळ ठरवेल हे निश्चित आहे, कारण असे निर्णय काही विकसित देशांनी त्यांच्या इतिहासात घेतले होते, म्हणुनच आज ते महासत्ता म्हणून मिरवू शकत आहेत. त्यामुळे शहाण्या असलेल्या या विरोधकांनी समर्थन करायचे नसेल तर किमान शांत तरी बसावे.
Wednesday, September 28, 2016
एक मराठा लाख मराठा !?!
कोपर्डीतील घटनेचे पडसाद म्हणून ठीक ठिकाणी मराठा समाजाकडून अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मूक मोर्चे काढले जात आहेत. (नक्कीच स्वागतहार्य आहे, समाज जागृत होत असल्याचे हे लक्षण आहे.)
परंतु कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड घटनेत बलात्कार करणारे नराधम दलित समाजातील होते म्हणून एका विशिष्ठ समाजास दोष देणे योग्य नाही...
आजवर अनेक विचित्र मानसिकतेच्या लोकांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले आहेत.
ते मराठा असोत वा दलित,
मग आजच का, या मोर्चे बांधणीचा अट्टाहास?
ते तरुण दलित होते म्हणून?
की खरंच समाज जागृत झाला आहे म्हणून?
म्हणजे इतर समाजातील विकृत लोक बलात्कार करत नाहीत असंच म्हनायचं?
यावेळी केवळ दलिताकडून मराठ्यांवर अत्याचार असा जो जातीय रंग पसरवला जात आहे तो योग्य नाही(हे पसरवण्यात प्रसारमाध्यमे आघाडीवर आहेत)...
मोर्चे निघत असताना बलात्कार थांबले आहेत का?
मागच्या आठवड्यात एक घटना उघड झाली आहे, जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केला!
मग तो दलित होता की मराठा की आणि कोणी यात तथ्य नाही. तो केवळ एक वासनांध नर होता...
हे मोर्चे समाज भावनांचा उद्रेक दर्शवत असले तरी यामधून जी फलश्रुती होणार आहे, जी शिकवण मिळणार आहे,
त्यामधून या पुरुषप्रधान संस्कृतीस नर आणि मादी या पलीकडील नात्यांचा पडत चाललेला विसर आणि पालक आणि पाल्य यांमधील हरवलेला संवाद सुधारण्यासाठी काही करता येते का हे या समाज बांधवानी विचारात घ्यायला हवे.
'एक मराठा लाख मराठा' चा आवाज देत महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाकडून अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धरीतीने या मोर्च्यांचे आयोजन होत आहे. आपल्या मागण्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या महाराष्ट्रीयन मराठा क्रांती मूक महामोर्च्याची इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे.
एवढ्या मोठया संख्येने सहभागी होत समाजाने एकत्रित येऊन मोर्चे काढण्याची बहुधा हि पहिलीच वेळ आहे,
असे असले तरी येथे एक गोष्ट स्पष्टपणे विचारावीशी वाटते की,
आज एकत्रित आलेला अखिल मराठा समाज खरंच एकत्रित आहे का हो?
येथे घराघरात, भाऊबंदकीमध्ये भावा-भावामध्ये वाद आहेत (ते इतरांमध्ये पण असतील ही, परंतु आपण घर पातळीवर एकजूट नाही आहोत, तर समाज पातळीवर कसे असू?),
आपली वृत्ती अनेक वेळा खेकड्याप्रमाणे दिसून येते, एकमेकांचे पाय ओढण्याची...
आपल्या गावामधील, भाऊबंदकीतील कष्टाळू आणि तत्पर लोकांना आपण पुढे जाण्याची संधी देत नाही, उलट त्यांच्यासोबत कुत्सित बुद्धीने वागतो,
त्यात बांधला बांध असून शेतीचे वाद, गावातील राजकारण, गटबाजी यामुळेच आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक असलेला मराठा समाज मागास होत चालला आहे,
प्रमाणात इतर समाज पाहिला, तर ते भाऊबंदकीत आणि संघटन पातळीवर देखील एकत्रित असतात, त्याचा परिणाम म्हणूनच आज मराठा समाजावर मोर्चे काढण्याची वेळ आली आहे.
येथे मराठा समाजामध्ये दोन भावांमध्ये, दोन घराण्यांमध्ये, दोन गल्ल्यामध्ये, दोन गावांमध्ये वाद आहेत.
मग आपण एकत्रित आहात, हे मान्य करायचे कसे?
जर अखिल मराठा समाजास समाज परिवर्तन घडवून आनायचे असेल, सर्व समाज संघटित करून सर्वांना एकत्रित पुढे न्यायचे असेल तर त्यासाठी आधी स्वतःपासून सुरुवात करत, मग कुटुंब, मग गाव आणि मग मराठा समाज असा विचार करत काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीचे वाद, वयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवतं एकत्रित येऊन एकमेकास समजून घेण्याची गरज आहे.
तरचं सर्व समाज संघटित होईल आणि सर्वांना सोबत पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
विचार बदला, मार्ग नक्की सापडेल...!






